श्री कृष्णाचा पाळणा
जो जो जो जो रे सुकुमारा ।
जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥
कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।
सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥
प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।
हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥
पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ
कृष्ण जन्मला कंसाचा काळ
जो बाळा जो जो रे जो |१|
दुसऱ्या दिवशी दु सरा रंग
रूप सावळे गोरस रंग
जसा झळकतो आरस्याचा भिंग
जो बाळा जो जो रे जो |२|
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा
सिता सावित्री बायांनो उठा
खारीक खोबरं साखर वाटा
जो बाळा जो जो रे जो |३|
चवथ्या दिवशी बोलली बाई
अनुसयेने वाजवली टाळी
कृष्ण जन्मला यमुना स्थळी
जो बाळा जो जो रे जो |४|
पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।
पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥
षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।
कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥
पाचव्या दिवशी सटवाई चा वेढा
लिंबू नारळ देवीला फोडा
तान्ह्या बाळाची दृष्ट गं काढा
जो बाळा जो जो रे जो|५|
सहाव्या दिवशी कलीचा मारा
राधाकृष्णाला घालती वारा
चला यशोदा आपुल्या घरा
जो बाळा जो जो रे जो|६|
सातव्या दिवशी सटवीचा महाल
तेथे सोनेरी मंडप लाल
यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोलं
जो बाळा जो जो रे जो|७|
आठव्या दिवशी अटकी चा थाट
भुलल्या गवळणी तिनशे साठ
श्री कृष्णाची पाहतात वाट
जो बाळा जो जो रे जो|८|
नवव्या दिवशी नववीचा खंड
तान्या बाळा ने घेतला छंद
'वासुदेवाचा सोडवावा बंध
जो बाळा जो जो रे जो |९|
दहाव्या दिवशी दहावीची रात
"तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून
टाकती माणिक मोती
जो बाळा जो जो रे जो |१०|
अकराव्या दिवशी नारद बोले
देवा तुम्ही हो किती झोपले
मथुरा नगरीत देवकीचे हाल
जो बाळा जो जो रे जो |११|
बाराव्या दिवशी बाराचं नारी
पाळणा बांधीला यशोदा घरी
त्याला लाभली रेशमी दोरी
जो बाळा जो जो रे जो |१२|
तेराव्या दिवशी बोलली बाळी
श्री कृष्ण जन्मला यमुना तळी
गवळणी संगे लावीतो खळी
जो बाळा जो जो रे जो |१३|
चौदाव्या दिवशी तोफा गर्जती
शंकर पार्वती नंदी वर येती
बाळाच्या डोळ्यात काजळ घालती
जो बाळा जो जो रे जो |१४|