📄️ अध्याय पहिला
श्रीगणेशाय नम॥ आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणार्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणार्या सूतांना प्रश्न विचारला ऋषी विचारतात, “हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा.” सूत सांगतात, “मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्य लोकांत आले. आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुखे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांंची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला.” नारद म्हणाले, “ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभ काळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुखे भॊगीत आहेत.” नारद म्हणाले, “हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो. भगवान् विष्णूंचे भाषण ऎकून नारदमुनी विष्णूंना म्हणाले, “हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते, ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा.” हे नारदाचे भाषण ऎकून भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत दुकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव व मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधू बांधवा समवेत सत्यनारायणा समोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दु:ख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे.” सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला.
📄️ दुसरा अध्याय
भगवान म्हणाले, “नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. ऎक, सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहात होता. भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दुखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऎकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांग.” हे वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंताचे भाषण ऎकून तो ब्राह्मण म्हणाला. “मी अतिशय दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा.” असे ब्राह्मणांचे भाषण ऎकून भगवान म्हणाले. “सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुखांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ब्राह्मणहो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य
📄️ तिसरा अध्याय
सूत सांगतात, “ऋषीहो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऎका. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा, भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्र्व्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता, सुंदरवदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्या वेळी साधुवाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला,
📄️ चवथा अध्याय
नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांस दक्षिणा देऊन आशिर्वाद घेतला व जावयासह स्वतःचे नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेष धारण करणार्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी “हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे, ते सांग” असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, “संन्यासीबुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली
📄️ पाचवा अध्याय
सूत सांगतात, “मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी