श्री गणपती स्तोत्र
प्रारंभी विनंती करू
प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा । अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा || चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी | हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ ||
मोरया मोरया गोड हे नाम तुझे | कृपा सागरा हेची माहेर माझे || तुझी सोंड बा वाकुडी एकदंता | मला बुद्धी दे मोरया गुणवंता || २ ||
गणपती म्हणे वेरण्या दुष्टाच्या संगती न लागावे | ज्याला मोक्षपदाची इच्छा, त्याने सदा मला गावे || ३ || देवा परमसमर्था दिनदयाला प्रभो जगन्नाथा | आलो शरण तुला मी, दिन तुझ्या ठेवितो पदी माथा || ४ ||
देवा तव सेवेचा सदिछेचा असो मला छंद | कि साधू संगतीचा ह्यांतच वाटो मनास आनंद || ५ || तू सागर करुणेचा देवा तुजलाच दु:ख सांगावे | तुज वाचुनी इतरांशी दिनमुख पसरोन काय मागावे || ६ ||
ganapati stotra , prarambhi vinati kru ganapati,ganapati,श्री संकटनाशनं गणपती स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥२॥
लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥
नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥४॥