Skip to main content

शुभं करोति कल्याणम

शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ।।
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।।
दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥

दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥

ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।।
घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन ।।
| दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥

अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ ।।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥

shubham karoti kalyanam stotram