बालाशिष स्तोत्र
तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा ! सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!
प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही ! शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!
दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी ! गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!
त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी ! तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!
अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी ! झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!
दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो ! मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!
balashish stotra