श्री हनुमान स्तुती
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी | अनादिनाथ पूर्ण तारावयासी || असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||१||
तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे | किती भाग्य वर्णू तया अंजनीचे || तिच्या भक्तिलागी असा जन्म झाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||२||
गिळायासी जाता तया भास्करासी | तिथे राहु तो येउनी त्याजपासी || तया चंडकीर्णा मारिता तो पळाला | नमस्कार माझा तया मारुतीला ||३||
खरा ब्रह्मचारी मनाते विचारी | म्हणोनी तया भेटला रावणारी || दयासागरू भक्तीने गौरविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||४||
सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा | धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा || गिरी आणुनी शीघ्र तो उठविला | नमस्कार माझा तया मारुतीला ||५||
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी | समस्तांपुढे तापसी निर्विकारी || नमू जावया लागी रे मोक्षपंथा | नमस्कार माझा तुम्हा हनुमंता ||६||
hanuaman stuti maruti stuti