श्री देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
devi aarati , durge durghat bhari
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
devi aarati , ashwin shuddh pakshi amba chalali
लोलो लागला अंबेचा
लोलो लागला अंबेचा, भेदाभेद कैचा आला कंटाळा विषयाचा, धंदा मुळ मायेचा ।। ध्रु.।।
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी। कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी। अंती नेतील हे यमदुत। न ये संगे कोणी। निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी।। लोलो।।१।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर। नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर। नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार। पाहे परमात्मा तो ध्यानी भासे शून्याकार।। लोलो।।२।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी। निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी। लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी। देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी।। लोलो।।३।।
गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा। दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा। आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।।। लोलो।।४।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत। दोघे भोपे भट। जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट। तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ।।५।। devi aarati , lolo lagala ambecha
आम्ही चुकलो जरी तरी काही
आम्ही चुकलो जरी तरी काही । तूं चुकू नको अंबाबाई ।।धृ .।
तुझे नांव ' आनंदी ' साजे | तुझा महिमा त्रिभुवनी गाजे | तुझे सगुणरूप विराजे | तुला वंदिती सन्मुनि , राजे । गुण गाती वेदशास्त्रेही ।। आम्ही ।।१ ।।
आम्ही अनाथ , दीन भिकारी । तूं समर्थ , प्रभु अधिकारी । आम्ही पतित पातकी भारी । तूं पावन भव संसारी । तू पर्वत , आम्ही रजराई ।। आम्ही || २ ||
आम्ही कुपुत्र म्हणवुन घेऊ । तू नको कुमाता होऊ | आम्ही विषय ढेकळे खाऊ । तूं प्रेमामृत दे खाऊ | आम्ही रांगू तू उभी राही ।। आम्ही || ३ ||
आम्ही केवळ जडमूढप्राणी | चैतन्यस्वरूप तू शहाणी । फट बोबडी आमुची वाणी । तूं वदू नको आमच्या वाणी । आम्ही रडू तू गाणे गाई ।। आम्ही ।।४ ।।
आम्ही चातक तुजविण कष्टी । तू करी कृपामृत वृष्टी । म्हणे विष्णुदास धरी पोटी । अपराध आमुचे कोटी । अशी आठवण असू दे हृदयी || आम्ही || ५ || amhi chukalo jari aarati ,devi aarati
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दनालागूनी । विविध तपाची करावयाची झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन
नवविध भक्तीच्या करुन नवरात्रा । करूणा पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ सासर्या सांडीन कुपात्रा ॥३॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन |
पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन मी कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन |
आता साजनी झाले मी निसंग । विकल्प नवर्याचा सोडियला, संग । कामक्रोध हे झोडियले मांग । केला मोकळा मार्ग सुरुंग ॥५॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन |
ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाऊनी नवस महाद्वारी फेडिला । एकपणे जनार्दन देखियला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥ आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन |
aaicha jogwa jogwa magen ,devi aaratiकापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला
कापराची ज्योत अंबे ओवाळु तुजला | भवानी ओवाळु तुजला ( देहंभावे अहंकार ) .. ( २ ) चरणी वाहीला ||
सप्तशतीच्या पाठे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली ( भक्तावर द्या या ) -२ अंबा प्रसन्न झाली || १ ||
दया क्षमा शांती अंबे उजळल्या ज्योती । रेणुके उजळल्या ज्योती ( स्वंय प्रकाशीत ) - २ पहिली अंबेची मुर्ती ।।
आनंदाने भावे कापुर आरती केली रेणुके आरती केली ( भक्ती भावे सेवा ) प्रेमभावे सेवा आईच्या चरणी वाहिली || २ ||
kaparachi jyot ambe tuz ovalu ,devi aarati