Skip to main content

श्री सिध्दनाथांची आरती

उभा माणगंगेतिरी काळांचा काळ ।
खड्ग: चक्र होती डौर त्रिशूळ ।।
काळासि शोभे शंखाची माळ ।
आपुल्या भक्तांचा करि सांभाळ ।।१।।


जयदेव जयदेव जय भैरवनाथा ।
आरती ओवाळू तुज कृपावंता । जयदेव जयदेव


प्रथम काशीक्षेत्री रहिवास केला ।
दैत्य संहारूनि कैलासि आला ।।
काळासूर मर्दूनि निर्वंश केला ।
काळ तो भैरव नाम पावला ।।२।। जयदेव जयदेव


पहिली होती सोन्याची सोनारी ।
तेथे सिध्दनाथ - आई जोगेश्वरी ।।
ऋद्धीसिद्धी त्यांच्या घरी काम करी ।
माधवास दासांतरी ।।३।। जयदेव जयदेव


।। श्री काळभैरावार्पणमस्तु ।।

shri siddhnathanchi aarati , mhasawad