Skip to main content

काळूबाईची आरती

जयदेवी जयदेवी काळूबाई पाजळल्या ज्योती|
ओवाळू आरती काळूबाई तुझी मूर्ती ||धृ||


काळूबाई स्थान तुझं ग मांढर डोंगराशी|
वरदहस्त देउनी छाया धरी पामराशी|
जयदेवी जयदेवी || १ ||

गोजिर मांगीर बुवा आहे गड राक्षनासी|
लाखो भक्त येती आई तुझ्या दर्शनासी|
जयदेवी जयदेवी || २ ||

मांढर देवी गाव पवित्र तुझ्या पायथ्याशी|
करवंदीची जाळी भोवती डोंगर माथ्याशी|
जयदेवी जयदेवी || ३ ||

लिंब नारळ चोळी पातळ मान तू घेसी|
पौषी पौर्णिमेला भक्ता दर्शन तू देसी|
जयदेवी जयदेवी || ४ ||

चाफ्यावरती नाग डुलतो पोर्णिमेदिवशी|
मांढरदेवी माता आई स्वरूप दावीशी|
जयदेवी जयदेवी || ५ ||

करता भक्ती तुझ्या द्वारी प्रसन्न तू होशी|
विगन टाळून आई इडा पीडा नेशी|
जयदेवी जयदेवी || ६ ||
kalubai aarati