Skip to main content
पडताळणी प्रलंबित

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा​

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये​

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
निढळावरी कर
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें
ठेवुनि वाट मी पाहें

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
जीवें भावें ओंवाळी

येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये
येई हो विठ्ठले माझे माउली ये

आरती अनंतभुजा​

आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥ न चालती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ आरती० ॥ ध्रु० ॥

परेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥ भुलला भक्तीभावे ॥ लाहो घेतला देही ॥ आरती० ॥ १ ॥

अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥ रामा जनार्दनी ॥ पायी जोडली वीट ॥ आरती० ॥ २ ॥

vitthal pandurang aarati, yuge atthavis ,yei o vitthale