श्री गणपती आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
ganapati aarati , sukhkrta dukhkartaसुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ।।ध्रु।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय .॥॥०२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वानीं रक्षावें सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया
tu sukhkrta dukhkartaतूं सुखकर्ता तूं दुःखहर्ता । विघ्न विनाशक मोरया ।
संकटीं रक्षी शरण तुला मी। गणपती बाप्पा मोरया ॥०१॥
मंगलमूर्ती तू गणनायक। वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।
तुझिया दारी आज पातलों। देई चित्त मज द्याया ॥०२॥
तूं सकलांचा भाग्य विधाता । तू विद्येचा स्वामी दाता ।
ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवी नैराश्याला ॥०३॥
तूं माता तूं पिता जगीं या। ज्ञाना तूं सर्वस्व जगीं या ।
पामर मी, स्वर उणे भासती तुझी आरती गाया ॥०४॥
मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरयो ॥
गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया
gajanana shri ganrayaगजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥
सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
bappa moraya reगणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया ।
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता ।
अवघ्या दीनांच्या नाथा ।
ब ाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे ।
चरणी ठेवितो माथा ॥०१॥
पहा झाले पुरे एक वर्ष ।
होतो वर्षानं एकदा हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श ।
घ्यावा संसाराचा परामर्ष ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची ।
वाचावी कशी मी गाथा ॥०२॥
आली कशी पहा आज वेळ ।
कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गूळ-फुटाणे खोबरं नि केळं ।
साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण ।
तूच पिता तूच माता ॥०३॥
नाव काढू नको तांदुळाचे ।
केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घराचे ।
दिन येतील का रे सुखाचे ।
देवा जाणुनि गोड मानुनि ।
द्यावा आशीर्वाद आता ॥०४॥
जय गणेश जय गणेश
jay ganesh jay ganesh jay ganesh deva
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार ्वती,
पिता महादेवा ॥
एक दंत दयावंत,
चार भुजा धारी ।
माथे सिंदूर सोहे,
मूसे की सवारी ॥
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
पान चढ़े फल चढ़े,
और चढ़े मेवा ।
लड्डुअन का भोग लगे,
संत करें सेवा ॥
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
अंधन को आंख देत,
कोढ़िन को काया ।
बांझन को पुत्र देत,
निर्धन को माया ॥
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
'सूर' श्याम शरण आए,
सफल कीजे सेवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
----- Additional -----
दीनन की लाज रखो,
शंभु सुतकारी ।
कामना को पूर्ण करो,
जाऊं बलिहारी ॥
जय गणेश जय गणेश,
जय गणेश देवा ।
माता जाकी पार्वती,
पिता महादेवा ॥
शेंदुर लाल चढ़ायो
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को । हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को, महिमा कहे न जाय लागत हूं पद को ।। ।। जय देव जय देव ।।
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।। । जय देव जय देव ।।
भावभगत से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सबहि भरपूर पावे । ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावीनन्दन निशिदिन गुण गावे ।। ।। जय देव जय देव ।।
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता । धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।। ।। जय देव जय देव ।।
shendur lal chadhayo ganapati aaratiनानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
na na parimal durva shendur shamipatre gnapati aarati