Skip to main content

श्री साईबाबा आरती

ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा

ओंवाळूं आरती माइया सदगुरुनाथा, साईनाथा ।।
पांचाही तत्वांचा दीप लाविला आतां ।।

निर्गुणाची स्थिति कैसी आकारा आली ।।
सर्वा घटीं भरुनि उरली सांई माउली ।। ओंवाळूं  ।।

रज तम सत्व तिघे माया प्रसवली ।।
मायेचिये पोटीं कैसी माया उद्घवली ।।।
।। ओंवाळूं  ।।

सप्तसागरी कैसा खेळ मांडीला ।।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ।।।
।। ओंवाळूं ।।

ब्रहांडींची रचना कैसी दाखविली डोळां ।।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ।।।
।। ओंवाळूं ।।

sainath saibaba aarati ovalu aarati mazya sainatha

जय देव जय देव जय दत्ता अवधूता

जय देव जय देव जय दत्ता अवधूता ।
साई अवधूता ।
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा ।
जय देव जय देव ।। धु ।।

अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी ।
नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं ।
हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।।
।। जय ।। १ ।।

यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें ।
संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें ।
मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियले ।।
।। जय ।। २ ।।

भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं ।
दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही ।
दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।।
।। जय ।। ३ ।।

देवा साईनाथ त्वत्पदनत व्हावें ।
परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें ।
देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।
।। जय ।। ४ ।।

sainath saibaba aarati jay dev jay dev jay avdhuta