Skip to main content

श्री शंकर महाराज आरती

आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।।
उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती ।।
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती । हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती ।।
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणू का भाविकास जननी ।।।
संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास ।।
करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची ।। १।।

आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।।
ध्यान हे रम्य मनोहर से । ध्यान धृड जडले नयनिसे ।।
भक्त हृदयाकाशी विलसे । तेज ब्रम्हांडी फाकतसे ।।
पितांबर शोभवित कटीला । भक्त मालिका हृद पटला ।।।
भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी ।।
करू नित्य सेवा चरणांची । करू या ज्ञानसागराची ।। २ ।।

आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।।
लक्षी जग प्रचंड नीज नयनी । लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी ।।।
हरिहर विधी, दत्त त्रिगुणी । आठवी नित्यभूवन सुमनी ।।।
दत्तमय असे योगिराणा । ओम कारीचे तत्व जाणा ।।।
धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण ।।
आस पुरवावी दासांची । करू या ज्ञानसागराची ।। ३ ।।।
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।

।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर महाराज कि जय ।।

shri shankar maharaj aarati shri shankar gurunchi