श्री विष्णु आरती
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें । भक्तीचें भूषण प्रेमे सुगंध अर्पिले ।।१।। अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढे । जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ।।२।। रमावल्लभदासे अहं ।। धूप जाळीला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।।३।।
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।१।। हरिख हरिक होता मुख पाहतां । चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।।२।। सद्भवालागी बहु हा देव भुकेला । रमावल्लभ दासे अहं नैवेद्य अर्पिला ।।३।।
फळे तांबूल दक्षणा अर्पिली । तया उपरी निरांजने मांडिली ।।१।। आरती करुं गोपा । मी तूं पण सांडोनि वेळोवेळा । पंचप्राण पंचज्योती आरती उजळली । दृश्य हे लोपले । तया प्रकाशांतळी ।।२।। आरती प्रकाशे चंद्र सूर्य लोपले । सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।।३।। देवभक्त पण न दिसे कांही । ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ।। आरती०।।४।।
आरती भुवनसुंदराची
आरती भुवनसुंदराची ।। इंदिरावरा मुकुंदाची ।। धृ० ।।
पद्मसम पादयुग्मरंगा ।। ओंवाळणी होति भृंगा ।।
नखमणि स्त्रवताहे गंगा ।। जे कां त्रिविधतापभंगा ।।
वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ।। किंकिणिव्कणित नाद घणघणित वांकिवर झुणित नेपुरें झनन मंजिराची ।।
झनन ध्वनी मंजिराची ।। आरती भुवन० ।। १ ।।
पीतपट हाटकतप्तवणीं ।। कांची नितंब सुस्थानीं ।।
नाभिची अगाध हो करणी ।। विश्वजनकाची जे जननी ।।
त्रिवलीललित उदरशोभा ।। कंबुगळा विलंबित झळाळ कौस्तुभ स रळ बाहु श्रीवत्सतरलमणिमरण कंकणाची ।।
प्रीती बहु जडित कंकणाची ।। आरती भुवन० ।। २ ।।
इंदुसम आस्य कुंदरदना ।। अधरारुणार्क बिंबवदना ।।
पाहतां भ्रांति पडे मदना ।। सजलमेघाब्धि दैत्यदमना ।।
झळकत मकरकुंडलाभा ।। कुटिलकुंतली मयूरपत्रावली वेष्टिले तिलक भालिं ।।
केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची ।। अक्षता काळि कस्तुरीची ।।
आरती भुवन० ।। ३ ।। कल्पद्रुमातळीं मूर्ती ।।
सौदामिनी कोटिदीप्ती ।। गोपीगोपवलयं भवतीं ।
त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ।। मंजुल मधुर मुरलिनादें ।।
चकित गंधर्व चकित अप्सरा सुरागिरिवरा ।। कर्पूरधरा रतींनें प्रेमयुक्त साची ।।
आरती ओवाळित साची ।। आरती भुवन० ।। ४ ।।
वृदावनींचिये विहरणीं ।। सखे गे कृष्ण माय बहिणी ।।
श्रमलों भवाब्धिचे फिरणीं ।। अतां मज ठाव देईं चरणीं ।।
अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ।। नमितों चरण शरण मी ।।
करुणा येऊं दे विशाळपाणी ।। कृष्ण नेणतें बाळ आपुलें राखिं लाज याची ।।
दयानिधे राखिं लाज याची ।। आरती भुवन० ।। ५ ।।
ॐ जय जगदीश हरे
ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे । भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
जो ध्यावे फल पावे, दुःख बिनसे मन का, स्वामी दुःख बिनसे मन का । सुख सम्पति घर आवे, सुख सम्पति घर आवे, कष्ट मिटे तन का ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
मात पिता तुम मेरे, शरण गहूं किसकी, स्वामी शरण गहूं मैं किसकी । तुम बिन और न दूजा, तुम बिन और न दूजा, आस करूं मैं जिसकी ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
तुम पूरण परमात्मा, तुम अन्तर्यामी, स्वामी तुम अन्तर्यामी । पारब्रह्म परमेश्वर, पारब्रह्म परमेश्वर, तुम सब के स्वामी ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
तुम करुणा के सागर, तुम पालन कर्ता, स्वामी तुम पालनकर्ता । मैं मूरख फलकामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भर्ता॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति । किस विधि मिलूं दयामय, किस विधि मिलूं दयामय, तुमको मैं कुमति ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
दीन-बन्धु दुःख-हर्ता, ठाकुर तुम मेरे, स्वामी रक्षक तुम मेरे । अपने हाथ उठाओ, अपने शरण लगाओ, द्वार पड़ा तेरे ॥ ॥ ॐ जय जगदीश हरे..॥
विषय-विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वमी पाप(कष्ट) हरो देवा । श्रद्धा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, सन्तन की सेवा ॥
ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे । भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे ॥
vishnu aarati , om jai jagadish hare