श्री हनुमान आरती
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ जय० ॥धृ०॥
दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥२॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ जय० ॥
जयजय महावीर धीर चिरंजिव
जयजय महावीर धीर चिरंजिव, मारुती बलभीमा । जनकसुता-भय-शोक-निवारण, कपिगण-विश्रामा ।
दशकंधर पुर दाहक प्रियकर, दाशरथी रामा ॥ जय जय॥धृ.॥
जन्मतांचि पुढें नवल देखिलें, रक्तवर्ण नयनीं ।।
बाळ क्षुधित तें फळ म्हणुनि बळें, झेंपावें गगनीं ।।
ग्रहणकाळ खग्रास केतुवत, रवि घालि वदनीं ।।
समर करुनि अरि अमर भासिले, करितां संग्रामा ॥ जय जय १॥
कडाडिलें ब्रह्मांड झोकितां, क्रोधें उड्डाण ।।
क्षणमात्रें तळ मुळ उत्पाटुन, आणिला गिरि द्रोण ।।
लक्ष्मणासह मृत रणकपिचा, जीवविला प्राण ।।
खळ राक्षसकुळ सकळ धाडिलें, रविनंदन-धामा ॥जय जय २॥
वज्रतनू घनशाम विराजे, तेज प्रखर तरणी ।अटिव जेठि निट कटि कासूटी, कुंडलेंदु करणी ।मुगुट गळा हार भार डोलती, नुपुर द्वय चरणीं ।सजल नयन पुट जलज वदन शशि, सज्जन सप्रेमा ॥ जय जय ३॥
दुर्घट संकटें कोटि लोपतीं, देतां बुभुःक्कार ।करुणासागर नत जनिं वागवि, ब्रीद अहंकार ।विष्णुदास कर जोडुनि नमना, करि वारंवार । चरण गुणार्णव अगणित वर्णन, न कळे तव सीमा ॥ जय जय ४॥
hanuman maruti aarati, jay jay mahavir dhir chirnjiv