Skip to main content

श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

datta aarati , trigunatmak traimurti

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती

श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ॥

ब्रम्हा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा|
कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा|
धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा|
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी,हातामधे अयुधे बहुत वरूनी ,|
तेणे भक्तांचे क्लेश हरूनी,त्यासी करूनी नमन|
अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रिलोक्यावरती|
......... ओवाळीतो प्रेमे आरती॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी|
भीमा अमर संगमासी भक्ती असे बहूत सुशिष्यांची|
वाट दावूनीया योगाची ठेव देत असे निज मुक्तीची|
काशी क्षेत्री स्नान करितो करविरी भिक्षेला जातो|
माहुरी निद्रेला वरीतो तरतरीत छाती, भरजरित|
नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती|
......... ओवाळीतो प्रेमे आरती ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्यकंदा|
तारी हा दास रुदनकंदा सोडवी विषय मोहछंदा|
आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरु ब्रम्हनंदा|
चुकवी चौरयांशीचा फेरा घालीती षडरिपू मज घेरा|
गांजीती पुत्र पौत्र दारा वदवी भजन मुखी, तव|
पूजन करीत असे सुजन तयांचे या दासावरती|
......... ओवाळीतो प्रेमे आरती ॥३॥

datta aarati , shri guru dattaraj murti ovalito preme aarati

आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी

आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।।
शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥

तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।।
अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥

शुद्धभाव देऊनि मज लावीं तव भजनीं ।।
प्रपंची त्रासलो यांतुनि काढावे क्षणीं ॥ २ ॥

तवगुणलीळा नित्यनिरंतर ऎकवी श्रवणी ।।
हाची वर मजला द्यावा श्रीगुरुमूर्तीनीं ॥ ३ ॥

मोरेश्वरसुत वासुदेव हा करितो तव सेवा ।।
स्वामि समर्था देई यांसी भक्तीचा ठेवा ॥ ४ ॥