Skip to main content
पडताळणी प्रलंबित

अनंताची आरती

आगमी निगमी तुझा न कळेची अंत । भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत ॥ मुनिजन लक्षी लक्षिता नव्हे तू प्राप्त । शेष सहस्त्रमुखी वर्णिता श्रमत ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री अनंता । आरती ओवाळू तुज आनंद भरिता ॥ ध्रु० ॥

भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती । षोडशपूजा करुनी ब्राह्मण पूजीती ॥ गोधुमवायन चौदा द्विजासि अर्पीती । त्यांसी सर्वहि सिद्धी देसी श्रीपती ॥ जय देव० ॥ २ ॥

कौडिण्य ब्राह्मण व्रत हे आचरला । करुणासागर तया प्रसन्न झाला ॥ भक्तीचा अंकूर त्रिभुवनि विस्तरला । एका जनार्दन चरणी नीवाला ॥ जय० ॥ ३ ॥

anantachi aarati