Skip to main content
सत्यापित

सरस्वतीची आरती

जय, जय, वाचा देवि ।। श्री सरस्वति ! माते ।। तुजविण संसारार्ति। नच कधिही टळते ।। १ ।॥ धृ० ।।

तव महिमा गातांना ।। मम वाणी दमते ।। वाग्देवि ! येऊं दे। स्फूर्तीते भरतें ।। २ ।।

मधुर विचारांची दे। प्रेरकशक्ती तूं ।॥ मधु-वच बोलूं दे मज । सुचवि सुशब्दहि तूं ।। ३ ।।

मधुर रसांची धारा। भक्ति तुझी जडली ।। दिव्य सृष्टी आंतिल । सत्य-मूर्त दिसली ।। ४ ।।

जय देवी ! जय अम्बे ! ।। नमक स्विकारीं । तेजोल्हासँ मजला । भरवीं संसारीं ।॥ ५ ॥

sarswatichi aarati