अन्नपूर्णा देवीची आरती
श्री अन्नपूर्णे देवी जयजय जगदंबे जननी । तुज ऐसी देवता नाही कोणी त्रिभुवनी ।। ध्रु० ।।
विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षणा होती। ती दोघेही अनन्यभावे तव भक्ति करिती । तुझ्या प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती। सुखशांती लाभली देवी ऐशी तव किर्ती ।। १ ।।
नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी। नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरुनी ।। जीवन जरि हें भरलें आहे व्याधिउपाधींनीं। प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळुनी ।। २ ।।
छंद मनाला तुझा लागला मी करितो धांवा । धावुनी ये देवते पाहुनी मम भक्तिभावा ।। अखंड शाश्वत प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ।। जन्ममृत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी द्यावा ।। ३ ।।
तूं माझी माऊली जाण मी बालक तव तान्हा । क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ।। अन्नवस्त्र दे वैभव सारे सुखभोगहिं नाना। मिलिंदमाधव करि प्रार्थना बंदुनी तव चरणां ।। ४ ।।
annapurna aarati