जय देव वैनतेया - गरुडाची आरती
जय देव जय देव जय वैनतेया । आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥ ध्रु० ॥
हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना । दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥ कांचनमयबाहू नाम सूपर्ण । नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥ जय० ॥ १ ॥
त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन । मुनींद्र्वचने केले सागरझडपन ॥ जलचरी वर्तला आकांत जाण । विनते पयोब्धीने केले सांत्वन ॥ जय० ॥ २ ॥
तूझे नाममंत्र जपती जे कोण । सर्पादिक विषबाधा नोहे निशिदिन ॥ ऐसा तू महाराजा पक्षींद्र जाण । म्हणवुनि कवि हा तुजला अनन्य शरण ॥ जय० ॥ ३ ॥
garud arati