श्री जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी स ंतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करुं पूजना । आघाडा दूर्वा माळा वाहूं या । अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू । सुवासिनींना भोजन देऊ । चणे हळददीकुंकू दूधही देऊं । जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूंचि तयांना मातां । यासाठी तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल वाढूं दे । सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनीचे हेतू पूर्ण होऊं दे ॥ ४ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
shri jivatichi aarati