Skip to main content
पडताळणी प्रलंबित

तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन

तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन

साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ ||

पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान

साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ ||

वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड

तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ ||

माझी बाप आणि आई तुच विठ्ठल रखुमाई

तुझ्या शिर्डी नगरात मी पंढरी पाहीन || ३ ||

पायी चालत येईन सुख दु:ख मी सांगीन

साई बाबा माझे साई ते दु:ख निवारील || ४ ||

तुला खांद्यावर घेईन तुला