काया ही पंढरी आत्मा हा
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥
kaya hi pandhari abhang