Skip to main content
पडताळणी प्रलंबित

दत्त दर्शनाला जायचं जायच….

दत्त दर्शनाला जायचं जायचं

आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||

गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ता ची भेट

या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना || १ ||

रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर

या या नजरेस आणि काही येईना || २ ||

रुती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग

या भजनाची हौस पुरी होईना होईना || ३ ||

नजर बंदीचा हा खेळ, खेळे सदगुरू प्रेमळ

खेळ खेळीता खेळ पुरा होईना || ४ ||

दत्त दर्शनाला जायचं जायच da