Skip to main content
पडताळणी प्रलंबित

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू

मकार महेश जाणियेला  || १ ||

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न

तो हा गजानन मायबाप ….. || २ ||

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी

पहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे omkar pradhan