ज्याचा सखा हरी
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करीं ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयाविण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
अंगा आपुले ओढोनी । त्याला राखतो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥
jyacha sakha hari abhang