Skip to main content
पडताळणी प्रलंबित

आवडीने भावे हरिनाम घेसी

आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ ||

सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ ||

आवडीने भावे हरिनाम घेसी aavadine bhave