आरंभी वंदीन अयोध्येचा
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा । भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥
पावतसे महासंकटीं निर्वाणीं । रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥
उच्चारितां राम होय पापक्षय । पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥
पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे । पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥
कांहिं केल्यां तुझें मन पालटेना । दास ह्मणे जन सावधान ॥५॥
aarambhi vandin abhang