Skip to main content

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा ह्मणे मज विठ्ठल सांपडला । ह्मणोनी कळिकाळां पाड नाहीं ॥४॥

tirth vitthal abhang