Skip to main content
पडताळणी प्रलंबित

जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव

जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव ||

देवा तुझे मनोरथ रूप मला दाव || धृ ||

समुद्राच्या लाटेवरती नाव आली मध्यावरती ||

बुडालो बुडालो देवा धाव || १ ||

नऊ महिने गर्भी राहिलो मानव रूपी जन्मा आलो ||

विसरलो देवा तुझे नाव || २ ||

आकारुनी सांगे तुका नाव घेत राहू नका ||

भोळ्या भक्तानो घ्या धाव || ३ ||

जुनी पुराणी नाव माझी किना