सावळें सुंदर रूप मनोहर
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगा ॥२॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥३॥
तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥४॥
savale sundar roop manohar abhang