Skip to main content
पडताळणी प्रलंबित

आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी

आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी || १ ||

जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || २ ||

जेव्हा नव्हत्या गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ३ ||

नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखिली पंढरी

चंद्राभागेच्या तटी | धन्य पंढरी गोमटी || ४ ||

आधी रचिली पंढरी मग वैकुंठ