Skip to main content
पडताळणी प्रलंबित

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥

भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचन काय लाज ॥२॥

मागें बहुतांचें फेडियलें ऋण । आह्मांसाठीं कोण आली धाड ॥३॥

वारंवार तुज लाज नाहीं देवा । बोलरे केशवा ह्मणे नामा ॥४॥

pandhari nivasa abhang