जें का रंजलेंगांजले
जें का रंजलेंगांजले । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनांचें चित्त ॥३॥
ज्यासि अपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ॥४॥
दया करणें जें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका ह्मणे सांगू किती । तोचि भगवंताच्या मूर्ती ॥६॥
je ka ranjale ganjale abhang