Skip to main content
पडताळणी प्रलंबित

आता बोला मुखाने हरि नाम | जय जय राम

आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम

आता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय राम

आता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||

राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झाला

ऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||

राम नामाने आवडीत घडले, पाण्यावरती पाषाण तरले

ऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||

एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकात

ऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||

आता बोला मुखाने हरि नाम जय