नामाचा गजर गर्जे भीमातीर
नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥
रिद्धीसिद्धी दासी अंगण झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ति चारी ॥२॥
चारी वेद भाट होऊनि गर्जती । सनकादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥
सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥
नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू । करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥
namacha gajar abhang