Skip to main content
पडताळणी प्रलंबित

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ ||

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ ||

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ ||

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ ||

तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||

घेई घेई माझे वाचे गोड नाम व