Skip to main content
पडताळणी प्रलंबित

देव एका पायाने लंगडा

असा कसा ग बाई

देवाचा देव ठकडा

देव एका पायाने लंगडा ||धृ||

गवळ्या घरी जातो | दही दुध खातो

करी दहया दुधाचा रबडा ||१||

शिंकेचि तोडीतो मडकेची फोडीतो |

पाडी नवनिताचा सडा ||२||

वाळवंटी जातो कीर्तन करितो

लावी साधुसंतांचा झगडा ||३||

एका जनार्दनी | भिक्षा वाढ मायी

देव एकनाथाचा बछडा ||४||

देव एका पायाने लंगडा asa kasa bai devacha dev thakada dev eka