विठ्ठल गीतीं गावा
विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तोचि शरणांगतां विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि । लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख । गोडावलें मुख तुका ह्मणे ॥५॥
vvitthal geeti gava abhang