Skip to main content
पडताळणी प्रलंबित

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत

पाहताची होती दंग आज सर्व संत

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत ||धृ||

युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी

धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी

अनाथांच्या नाथ हरी असे कृपावंत ||१||

कुठली ती होती माती कोण तो कुंभार

घडविता उभा राहे पहा विश्वंभर

तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत ||२||

पाहुनिया विटेवरी विठू भगवंत

दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत

गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ ||३||

विठ्ठलाच्या पायी विट झाल