पावलों पंढरी वैकुंठभुवन
पावलों पंढरी वैकुंठभुवन । धन्य अजि दिन सोनियाचा ॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥२॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलों ॥३॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥
पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥
पावलों पंढरी आपुले माहेर । नाहीं संवसार तुका ह्मणे ॥६॥
pavlo pandhari abhang