राजस सुकुमार मदनाचा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठी वैजयंती ॥२॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥३॥
कांसे सोनसळा पांघरे पांटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं ॥५॥
rajas sukumar abhang