Skip to main content
पडताळणी प्रलंबित

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनाच्या नाथा

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा

बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्ष

गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श

पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,

गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,

करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||

नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे

हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे

सेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ ||

तूच सुखकर्ता तूच दुखहर्त