Skip to main content
पडताळणी प्रलंबित

नमन माझे गुरुराया | महाराजा दत्तात्रया || धृ ||

नमन माझे गुरुराया |

महाराजा दत्तात्रया || धृ ||

तुझी अवधूत मूर्ती

माझ्या जीवीची विश्रांती || १ ||

माझ्या जीवीचे साकडे

कोण निवारील कोडे कोडे || २ ||

माझ्या अनुसूया सुता

तुका म्हणे पाव आता || ३ ||

नमन माझे गुरुराया महाराज