Skip to main content
पडताळणी प्रलंबित

पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा

पांडुरंगा पांडुरंगा

मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||

पंचतत्वाचा केला पतंग

धागा लाविला निळा रंग || १ ||

साही शास्त्रांचा सुटला वारा

चारी वेदांचा आधार त्याला || २ ||

तुका म्हणे मी झालो पतंग

धागा आवरा हो पांडुरंग || ३ ||

पांडुरंगा मी पतंग तुझ्या