Skip to main content
पडताळणी प्रलंबित

चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट

चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग …..

हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाट …..

चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

ठाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग …..

लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..

चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

रायगड चा लोहार बोलवा ग, आईला त्रिशूल घडावा ग …..

उदो ग कोंबड्याच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते वाट …..

चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट …..

चांदण चांदण झाली रात एकवि