Skip to main content
पडताळणी प्रलंबित

दुसरे शिवाजी होवून गेले बाळासाहेब ठाकरे

“ हिंदूहृदयसम्राट ” मराठी मनाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील युवा मनाला साद घालणारे, व्यंग्यचित्राच्या माध्यमातून, देशातील तमाम राजकारण्यांना आसूड ओढणारे, सामान्य माणसाला रावाचा रक करणारे, हिंदुत्वाची कास धरणारे, राष्ट्राविषयी कडवटपणा अंगी असलेले, हिंदूहृदयसम्राट मा. श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसा निम्मित विनम्रतापूर्वक अभिवादन ……!!

हिंदूधर्माच्या रक्षणासाठी दिला वैऱ्याना धाक रे

दुसरे शिवाजी होवून गेले बाळासाहेब ठाकरे || धृ ||

शिवरायाचा लढावु बाणा, रुजविला कणाकणात,

चैतन्याचा प्रकाश पाडीला, साऱ्यांच्या मनामनात,

बोलणे त्यांचे ते रोख ठोक, विचार त्यांचे ज्वलंत,

शिवसेना ही चार अक्षरे, वसविली जना जनात,

जय हिंद जय महाराष्ट्र, दिला भगव्याचा धाक रे || १ ||

महाराष्ट्राचे एकच वाघ, इतिहास रचिला नवा नवा

शिवतिर्थावर बाळासाहेबाचा, भव्य स्मारक हवा हवा

बॉम्बे ची ही मुंबई केली, महाराष्ट्राची शान रे || २ ||

झाले नाही होणार नाही, कीर्ती गातील पोवाडे,

मुख्य मनाने किती उधळावे शब्दांचे हे बुडबुडे,

काय झाला सांगा हा गुन्हा, महाराष्ट्र केला सुना सुना,

पोरके का केलेत आम्हा, जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा,

आठवण येता सचिन सांगे, हृदय माझे पाझरे || ३ ||

दुसरे शिवाजी होवून गेले ब