Skip to main content
पडताळणी प्रलंबित

देव माझा विठू सावळा

देव माझा विठू सावळा

माळ त्याची माझिया गळा….. || धृ ||

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी,

भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ….. || १ ||

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर

कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा…. || २ ||

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो

रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा….. || ३ ||

देव माझा विठू सावळा dev majha vithu savala