Skip to main content
पडताळणी प्रलंबित

नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू

नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||

आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||

टाळ  विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||

नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||

नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबा