Skip to main content
पडताळणी प्रलंबित

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभावे ||१||

येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी घेत नाही ||२||

बंधनापासुनि उकलल्या गांठी | देता आले मिठी सावकाश ||३||

तुका म्हणे देह भरीला विठ्ठले | कामक्रोध केले घर रिते ||४||

बोलावा विठ्ठल पाहावा विठ